Type Here to Get Search Results !

मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र 2023-2024

0

मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र 2023-2024

मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र 2023-2024

मराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023 मध्ये मोदी आवास घरकुल योजना चा शुभारंभ झालेला आहे, या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना दहा लाखाहून अधिक घरे तीन वर्षात बांधून देण्याचा निश्चय राज्य सरकारने केला आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये याच मोदी आवास घरकुल योजनेबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा

मोदी आवास घरकुल योजना पात्रता (Modi Awas Gharkul Yojana Elegeblity)

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  • अर्जदार OBC प्रवर्गातील चा दाखला असावा.
  • अर्जदाराची वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
  • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अर्जदाराला कोणत्याही स्वरूपाची घरकुल मिळालेले असू नये.
  • इतर सरकारी गृहनिर्माण योजनेचा अर्जदार लाभ घेत नसावा.

मोदी आवास घरकुल योजना साठी लागणारे कागदपत्रे (Modi Awas Gharkul Yojana Document list)

  • आधार कार्ड
  • OBC प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

मोदी आवास घरकुल योजना साठी अटी 

1) मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

2) या संदर्भात पंतप्रधान आवास योजनेत अपात्र ठरलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे, या योजनेत पात्र राहूनही इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना लाभ मिळत नव्हता. मात्र आता मोदी आवास योजनेतून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल.

3) इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा जास्त नसावे.

4) कुटुंबीयांच्या मालकीची राज्यात पक्के घर नसावे.

5) गृह कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

6) लाभार्थी हा पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत च्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट नसावा अशी अट अशा अटी पंतप्रधान मोदी आवास योजनेसाठी लागू करण्यात आलेले आहेत.

 

Post a Comment

0 Comments